MALERIYA, PILLS& Other Fever. Cont. Shraddha Wealth Management pvt.ltd.
9967460086/ 8655503980 / 9594014509 / 7506288705
पाइल्स वाचविण्यावर तज्ज्ञांचा भर
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
मूळव्याधीला पाइल्स म्हटले जात असले तरी मुळात पाइल्स म्हणजे पचनसंस्थेचाच शेवटचा भाग. याला होणारा आजार पाइल्स म्हणून ओळखला जातो. या पाइल्सची निर्मिती कृत्रिमरीत्या शक्य नसल्याने जगभरातील शल्यतज्ज्ञ पाइल्स वाचविण्यावर भर देत आहेत.
महेश तिवारी, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्य़ात फॅल्सीपॅरम मलेरियाने थैमान घातले आहे. गेल्या आठ दिवसांत अडीच हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्ययंत्रणा हादरुन गेली आहे. गेल्या काही महीन्यात या आजारामुळे सतरा जणांचे बळी गेले आहेत. तर फल्सीपॅरम मलेरियाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या मच्छरदाण्या आणि इतर औषधांचा आरोग्य खात्याकडे तुटवडा आहे.

१५-२०
वर्षांपूर्वीपर्यंत मूळव्याधीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना त्याच्या
पाइल्स काढून टाकल्या जायच्या. मात्र, शरीरात असलेले पाइल्सचे महत्त्व
पाहता शक्यतो पाइल्स वाचविण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येकच व्यक्तीत
पाइल्स असतात. शौच मार्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम या पाइल्सकडे असते.
मांसपेशी, रक्तवाहिन्या यांनी मलमार्गाच्या शेवटी तयार झालेले तीन गोलाकार
उंचवटे म्हणजे पाइल्स. बदललेली जीवनशैली, ताण, चायनीज व जंकफूड यांमुळे या
उंचवट्यांना इजा पोहचते व त्यालाच आपण पाइल्स झाले म्हणतो. पाइल्स झाले
म्हणजे हे तिन्ही गोलाकार उंचवटे एकदम व्याधिग्रस्त झाले असे होत नाही.
त्यामुळे जेवढा भाग व्याधिग्रस्त असेल तेवढाच गरज असल्यास काढावा. शक्यतो
आधी औषधांद्वारेच पाइल्सवर उपचार करावे व ऑपरेशन करायचेच असल्यास कमीत कमी
त्रासात व वेळेत किती पाइल्स वाचवू शकतो याकडे लक्ष द्यावे, असे जगातील
तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये पाइल्सचे प्रमाण अधिक
असते. एक तृतियांश महिलांना प्रसूतीनंतर हा आजार होत असतो. गेल्या काही
वर्षांत या रुग्णांमध्ये सेल्फ डायग्नोसिसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले
आहे. इंटरनेटवर या आजाराविषयी माहिती काढून आपल्याला असणाऱ्या लक्षणांशी ती
पडताळून पाहायची आणि स्वतःच औषोधोपचार करायचा, असेही रुग्ण असतात. पण
शेवटी त्यांना एखाद्या तज्ज्ञाकडेच जावे लागते.
पाइल्स तयार करता येत नाही
एखाद्याच्या पाइल्स खराब झाल्या तर त्या काढून तेथे नवीन पाइल्स बसवता येत नाहीत. ज्याप्रमाणे पाणी तयार करता येत नाही तसेच पाइल्सही तयार करता येत नाहीत. तेथे प्लास्टिक सर्जरीही करता येत नाही. त्यामुळे पाइल्स वाचविण्यावरच आमचा भर राहतो. आपल्याकडे एक मानिसकता अजून दिसते. ऑपरेशन झलेला रुग्ण, डॉक्टर आता मला पुन्हा त्रास होणार नाही ना? असा प्रश्न विचारतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एकदा ऑपरेशन झाले तरी हा आजार पुन्हा होऊ शकतो. पाइल्सच्या ज्या भागावर शस्त्रक्रिया केली तो सोडून अन्यत्र पुन्हा तसाच त्रास झाला तर आपले ऑपरेशन सक्सेस झाले नाही, असा गैरसमज रुग्ण करून घेतात. रक्तवाहिनीत ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास केली जाते. मात्र, एकदा हे उपचार केले की पुन्हा कधीच ब्लॉकेज होणार नाही असे नाही. तसेच पाइल्सचेही आहे. त्यामुळे याबाबतची जागरूकता आवश्यक आहे, असे पाइल्स तज्ज्ञ डॉ. प्रवीण गुप्ता सांगतात.
फॅल्सीपॅरम मलेरियाचे थैमानपाइल्स तयार करता येत नाही
एखाद्याच्या पाइल्स खराब झाल्या तर त्या काढून तेथे नवीन पाइल्स बसवता येत नाहीत. ज्याप्रमाणे पाणी तयार करता येत नाही तसेच पाइल्सही तयार करता येत नाहीत. तेथे प्लास्टिक सर्जरीही करता येत नाही. त्यामुळे पाइल्स वाचविण्यावरच आमचा भर राहतो. आपल्याकडे एक मानिसकता अजून दिसते. ऑपरेशन झलेला रुग्ण, डॉक्टर आता मला पुन्हा त्रास होणार नाही ना? असा प्रश्न विचारतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एकदा ऑपरेशन झाले तरी हा आजार पुन्हा होऊ शकतो. पाइल्सच्या ज्या भागावर शस्त्रक्रिया केली तो सोडून अन्यत्र पुन्हा तसाच त्रास झाला तर आपले ऑपरेशन सक्सेस झाले नाही, असा गैरसमज रुग्ण करून घेतात. रक्तवाहिनीत ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास केली जाते. मात्र, एकदा हे उपचार केले की पुन्हा कधीच ब्लॉकेज होणार नाही असे नाही. तसेच पाइल्सचेही आहे. त्यामुळे याबाबतची जागरूकता आवश्यक आहे, असे पाइल्स तज्ज्ञ डॉ. प्रवीण गुप्ता सांगतात.
महेश तिवारी, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्य़ात फॅल्सीपॅरम मलेरियाने थैमान घातले आहे. गेल्या आठ दिवसांत अडीच हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्ययंत्रणा हादरुन गेली आहे. गेल्या काही महीन्यात या आजारामुळे सतरा जणांचे बळी गेले आहेत. तर फल्सीपॅरम मलेरियाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या मच्छरदाण्या आणि इतर औषधांचा आरोग्य खात्याकडे तुटवडा आहे.
राज्यात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २२ टक्के
आहे. सध्या धानोरा एटापल्ली भामरागड सिरोंचा कोरची तालुक्यात मोठया
प्रमाणात फॅल्सीपॅरमचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठ दिवसात अडीच हजार
रुग्ण आढळले असून सहा महिन्यातला आकडा अकरा हजार झाला आहे, अशी माहिती
जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी डॉ. रवींद्र ढोले यांनी दिली. शासकीय
रुग्णालयांबरोबरच शोधग्राम येथील डॉ. अभय बंग आणि हेमलकसा येथील डॉ. प्रकाश
आमटे यांच्या रुग्णालयांमध्येही फॅल्सीपॅमरचे रुग्ण दररोज दाखल होत आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणा या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असली
तरी अपुऱ्या सोयींमुळे त्यात फारसे यश मिळू शकलेले नाही. मलेरिया
निर्मुलनासाठी आवश्यक असलेल्या एसीटी गोळ्यांची आरोग्य खात्याकडे कमतरता
आहे. आगामी काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सुमारे सहा लाख नागरिक
फॅल्सीपॅमरच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे. परंतु, आरोग्य
खात्यातर्फे मात्र केवळ पन्नास हजार मच्छरदाण्यांचे वाटप झाले आहे.
त्यासोबतच मच्छरदाणी धुण्यासाठी आवश्यक असलेले डेल्टा मॅथरिन औषधीचा तुटवडा
आहे. डेल्टा मॅथरिन मध्ये बुडविल्यास डास त्यावर येताच त्याचा मृत्यु
होतो. हिवताप निर्मूलन विभागाने राज्य सरकारकडे पाचशे लिटर डेल्टा मॅथरीनची
मागणी नोंदविली होती. मात्र केवळ साठ लीटर डेल्टा मॅथरीन उपलब्ध झाले.
दुसरीकडे ९४ पदे रिक्त असल्याने औषधींबरोबरच मनुष्यबळाच्या समस्येलाही
जिल्हा हिवताप निर्मूलन खात्याला तोंड द्यावे लागत आहे.
पोलिसही सतर्क
गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम भागात माओवाद्यांशी लढण्यासाठी पोलिस आणि निमलष्करी दलांचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. माओवाद्यांशी लढत असतानाच मलेरियाच्या डासांशीही या सुरक्षा दलांना मुकाबला करावा लागत आहे. फॅल्सी पॅरममुळे अद्याप एकाही जवानाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र, हा आजार जिल्ह्यातील मोठा परिसर कवेत घेण्याच्या स्थितीत असल्याने सुरक्षा दलेही सतर्क झाली आहेत.
राज्यात फॅल्सीपॅरम या मलेरियाची गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक तीव्रता आहे. मात्र, या आजाराकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.
-डॉ. राणी बंग, सामाजिक कार्यकर्त्या

Post a Comment